प्रेग्नेंट पत्नीसाठी दिला पाठिंबा, सोडली 1.2 कोटींची नोकरी; म्हणाला – “पैसे पुन्हा मिळतील, पण हे क्षण परत येणार नाहीत”

प्रेग्नेंट पत्नीसाठी दिला पाठिंबा, सोडली 1.2 कोटींची नोकरी; म्हणाला – “पैसे पुन्हा मिळतील, पण हे क्षण परत येणार नाहीत”
कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की, निर्णय मनाने घ्यावे लागतात – केवळ पैशांच्या गणितावर नाही. बेंगळुरूच्या एका तरुणाने घेतलेला असा एक भावनिक निर्णय सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
या तरुणाने आपल्या गरोदर पत्नीची काळजी घेण्यासाठी तब्बल 1.2 कोटींच्या पॅकेजची नोकरी सोडली.
प्रेमासाठी माणूस काहीही करतो, पण या पतीची कथा ऐकून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले. बेंगळुरूमधील या व्यक्तीकडे घरून काम करण्याची सुविधा,
आरामदायक जीवनशैली आणि प्रचंड पगार होता – पण त्याने हे सर्व सोडण्याचा निर्णय घेतला, फक्त आपल्या प्रेग्नेंट पत्नीसोबत प्रत्येक क्षण घालवता यावा म्हणून.
काही लोक म्हणाले बनावट, तर काहींनी भरभरून केली स्तुती
सोशल मीडियावर या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. काहींनी ती बनावट असल्याचे म्हटले, तर काहींनी अशा गोष्टी क्वचितच घडतात असे सांगितले. अनेकांनी त्याच्या या निर्णयाचे कौतुक करत त्याला आशीर्वाद दिले.
१५ वर्षांचा साथसंगत आणि आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय
‘1 कोटींपेक्षा जास्त पगाराची नोकरी सोडली, कारण पत्नीच्या गर्भधारणेदरम्यान तिचा आधार व्हायचं होतं’ – अशा शीर्षकाने रेडिटवर पोस्ट शेअर करणाऱ्या या व्यक्तीने सांगितले की तो कॉलेज ड्रॉपआउट आहे,
पण स्टार्टअप्समध्ये मेहनत करून ७ वर्षांत शून्यापासून ७ कोटी रुपयांची संपत्ती उभी केली.
जय नगरमध्ये आलिशान घर, 1.2 कोटींची सॅलरी आणि वर्क फ्रॉम होम… सर्व काही होते. पण पत्नी प्रेग्नेंट झाल्यानंतर त्याने आपल्या करिअरला काही काळासाठी ब्रेक देण्याचा निर्णय घेतला.
त्याने लिहिले – “मी पत्नीला सुचवले की एक वर्षासाठी तू नोकरी सोड, पण तिला तिचं काम चालू ठेवायचं होतं. मग मीच निर्णय घेतला की मीच माझी नोकरी सोडतो.
या काळात मी संपूर्ण वेळ तिच्यासोबत राहीन – घरकाम, बागकाम, चालायला नेणे, आईवडिलांना बोलावणे – या सगळ्या गोष्टी अनुभवायच्या होत्या.”
पैसे परत मिळू शकतात, पण हे क्षण पुन्हा मिळणार नाहीत
या पोस्टमध्ये त्याने पुढे लिहिले – “माझ्या नशिबाचा मी आभारी आहे की मी हा निर्णय घेऊ शकलो. माझ्या अनुभव आणि कनेक्शन्समुळे मला पुन्हा नोकरी मिळवता येईल,
पण आयुष्यात योग्य वेळी योग्य ठिकाणी असणे हेच महत्त्वाचे आहे – जेव्हा तुमच्या जोडीदाराला, मुलांना किंवा पालकांना तुमची गरज असते. बाकी सर्व नंतर.”
सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
या पोस्टवर अनेकांनी स्तुती केली. कुणी म्हटले “हे खरे हसबंड गोल्स आहेत”, तर कुणी म्हणाले “हेच खरी जीवनातील प्रायोरिटी समजून घेणे आहे”.
मात्र, काहींनी असेही सांगितले की प्रत्येकाला अशी आर्थिक स्थैर्य नसते की नोकरी सोडता येईल.
त्यावर उत्तर देताना त्या व्यक्तीने लिहिले – “हो, बरोबर आहे. सगळ्यांच्या परिस्थिती वेगवेगळ्या असतात. म्हणूनच मी स्वतःला ‘ब्लेस्ड’ म्हणतो.”
आपल्या पत्नीबद्दलही त्याने भरभरून कौतुक केले – “खरं सांगायचं तर मीच या नात्यात जॅकपॉट मारला आहे. ती खूप मेहनती आणि समजूतदार आहे. आम्ही शाळेपासून – म्हणजे १५ वर्षांपासून – एकमेकांना ओळखतो.”
तुमचं काय मत आहे या निर्णयावर? कमेंटमध्ये नक्की सांगा.