Numbness in Hands and Feet
मित्रानो आजच्या धावपडीच्या जीवनात स्वतःला तंदुरुस्त ठेवणे खूप कठीण काम झाले आहे. रोज खाण्या पिण्यामध्ये आपल्या शरीराला पाहिजे तेवढे जीवन सत्व मिळत नाही.
त्यामुळे कधी तुमच्या हातात किंवा पायात अचानक काहीच जाणवत नाही? जणू कोणीतरी चिमटी काढली, पण तुम्हाला काहीच कळलं नाही? काही क्षणांनी झणझण, सुई टोचल्यासारखं वाटायला लागतं. हे कधीमधी होणं नॉर्मल असू शकतं, पण जर ही समस्या वारंवार होत असेल, तर ती शरीरात एखाद्या गरजेच्या पोषक तत्त्वाच्या कमतरतेचा संकेत असू शकते.
डॉ. शुचिन बजाज सांगतात की, वारंवार हात-पाय सुन्न होणे हे फक्त थकवा किंवा चुकीच्या पोजिशनमुळे होत नाही, तर यामागे Vitamin B12 Deficiency असण्याचीही शक्यता असते.
Vitamin B12 ची कमतरता का होते?
Vitamin B12 हा एक अत्यंत महत्त्वाचा पोषक घटक आहे जो शरीरात Red Blood Cells तयार करतो आणि Nervous System नीट काम करतं याची खात्री करतो.
ही कमतरता प्रामुख्याने त्या लोकांमध्ये दिसून येते जे पूर्णपणे Vegetarian आहेत, कारण B12 चे मुख्य स्रोत म्हणजे मांस, अंडी, मासे आणि डेअरी प्रोडक्ट्स.
Vitamin B12 कमतरतेची लक्षणं
हात-पाय सुन्न होणे किंवा झणझण होणे
थकवा आणि कमजोरी
लक्ष कमी लागणे किंवा विसरभोळेपणा
चक्कर येणे
डिप्रेशन किंवा मूड स्विंग्स
जीभ सूजणे किंवा तोंडात अल्सर
Solution काय आहे?
आहारामध्ये अंडी, दूध, दही, पनीर, चिकन, मासे यांचा समावेश करा
जर तुम्ही शुद्ध शाकाहारी असाल, तर डॉक्टरच्या सल्ल्याने Vitamin B12 Supplements घ्या
गंभीर परिस्थितीत डॉक्टर Vitamin B12 Injection किंवा गोळ्या घेण्याचा सल्ला देऊ शकतात
वेळोवेळी Blood Test करून B12 चा लेव्हल तपासत राहा, विशेषतः जर तुम्हाला थकवा, सुन्नपणा किंवा चक्कर यांसारखी लक्षणं जाणवत असतील
Imp Msg
हात-पाय वारंवार सुन्न होणं ही सामान्य वाटणारी गोष्ट असली तरी तिच्या मुळाशी Vitamin B12 ची कमतरता असू शकते.
ही कमतरता वेळेवर ओळखून उपचार न घेतल्यास Nerve Damage होण्याचा धोका असतो. म्हणूनच शरीराचे लक्षणे दुर्लक्षित करू नका आणि योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
FAQs
Vitamin B12 कमी का होतं?
मुख्यतः शाकाहारी लोकांमध्ये ही कमतरता दिसून येते कारण B12 चे स्रोत प्रामुख्याने नॉन-व्हेज आणि डेअरीमध्ये असतात.
B12 ची कमतरता किती गंभीर असते?
ही कमतरता नसांवर परिणाम करू शकते आणि योग्यवेळी निदान न झाल्यास ती कायमस्वरूपी Damage करू शकते.
हात-पाय झणझण करणे यामागे दुसरे कारण असू शकते का?
हो, पण जर ही समस्या वारंवार होत असेल आणि B12 कमी असेल, तर ती मुख्य कारण मानली जाते.
B12 नैसर्गिकरित्या कसा वाढवायचा?f
अंडी, दूध, चीज, मासे, चिकन, दही हे खाण्यात नियमित घ्या.
शुद्ध शाकाहारी लोक काय करावं?
Doctor च्या सल्ल्याने Supplement घेणे हा योग्य पर्याय आहे.
Supplement घेणं सुरक्षित आहे का?
हो, पण डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच घेणं गरजेचं आहे.
B12 कमी आहे का हे कसं कळतं?
साधा Blood Test करून हे समजू शकतं.
B12 कमी असल्यावर कोणता Treatment दिला जातो?
साधारणपणे गोळ्या किंवा Injection दिले जातात.
हे लक्षणं कायमस्वरूपी जातात का?
योग्य उपचार घेतल्यास अनेकदा लक्षणं पूर्णतः कमी होऊ शकतात.
यासाठी कुठल्या डॉक्टरकडे जावं?
General Physician, Neurologist किंवा Nutritionist यांच्याशी संपर्क साधा.
Disclaimer
ही माहिती विविध मीडिया रिपोर्ट्सवर आधारित आहे. कृपया कोणताही उपचार किंवा Supplement सुरू करण्यापूर्वी संबंधित डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
फार्मर कप' द्वारे १५ हजार शेतकरी उत्पादक गट तयार करण्याचे उद्दीष्ट Source Google imeage राज्यातील…
Source Google imeage LIC, बँक की पोस्ट ऑफिस – कुठे कराल गुंतवणूक आणि जास्त परतावा…
Sim card Froud Google imeage eSIM ठगी: भारत सरकार ने मोबाइल यूज़र्स को अलर्ट कियाभारत…
Source Google imeage मोदी चीन दौरा : तियानजिन में एससीओ शिखर सम्मेलन में पीएम मोदी…
Google imeage नई दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शंघाई कोऑपरेशन ऑर्गनाइजेशन (SCO) शिखर सम्मेलन में…
‘प्रतिभा सेतु’ पोर्टल : UPSC उमेदवारांसाठी नवी संधीभारतातील UPSC (Union Public Service Commission) ची सिव्हिल…