दुनिया झुकते, झुकवणारा पाहिजे”, असं म्हणत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी

नागपूर – “दुनिया झुकते, झुकवणारा पाहिजे”, असं म्हणत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अमेरिकेसोबत सुरू असलेल्या टॅरिफ विवादावर अप्रत्यक्ष भाष्य केलं.
ते विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी (VNIT), नागपूर येथे एका कार्यक्रमात बोलत होते.
गडकरी म्हणाले की, आजच्या जागतिक स्तरावर जे देश दादागिरी करत आहेत, त्यामागे त्यांची strong economy आणि advanced technology आहे.
भारतानेही science & technology चा योग्य वापर केल्यास, जगात आपली ताकद उभी राहू शकते.
“दुनिया झुकते, झुकवणारा पाहिजे
गडकरी म्हणाले, “आज आपल्या देशात अनेक विषयांवर चर्चा सुरू आहे, पण नाव न घेता सांगतो की, सध्या संपूर्ण जग अनेक समस्या भोगत आहे.
यावर एकच उपाय आहे – तो म्हणजे science and technology. जर आपण ज्ञानाची ताकद वापरली, तर ‘दुनिया झुकते, झुकवणारा पाहिजे’ हे खरं करून दाखवता येईल.”
“देशभक्ती म्हणजे Import कमी आणि Export वाढवणं”
गडकरी यांनी भारताच्या import-export policy वरही भाष्य केलं. ते म्हणाले, “आजच्या घडीला सर्वात मोठी देशभक्ती म्हणजे आपला import कमी करणं आणि export वाढवणं.
जर आपण Vishwaguru बनायचं स्वप्न पाहत असू, तर हेच सर्वात महत्त्वाचं आहे.”
ते पुढे म्हणाले, “आपल्या research organisations नी देशाच्या गरजा लक्षात घेऊन काम केलं पाहिजे. प्रत्येक district आणि region मध्ये वेगवेगळ्या गरजा असतात, त्यानुसार innovation आणि technology development झालं पाहिजे.”
“आपल्याला कुणाकडे जाण्याची गरज नाही”
गडकरी म्हणाले, “जर आपली economic growth rate चांगली असेल, तर आपल्याला कुणाकडे झुकण्याची गरज नाही.
जे देश आज दादागिरी करत आहेत, ते त्यांच्याकडे असलेल्या economic power आणि technology मुळेच हे करू शकतात.
पण आपल्याकडे ही ताकद आली, तर आपण कुणावर दडपण आणणार नाही, कारण आपली culture आपल्याला ‘वसुधैव कुटुंबकम’ शिकवते.”
अमेरिकेच्या टॅरिफ वाढीवर अप्रत्यक्ष उत्तर?
गडकरींच्या या वक्तव्याचा संदर्भ अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या 25% extra tariff शी जोडला जातोय. 27 ऑगस्टपासून हा वाढीव टॅरिफ लागू होणार असून, भारतावर एकूण 50% टॅरिफ लागू होईल.
गडकरींचं हे वक्तव्य या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं मानलं जात आहे, कारण त्यांनी आत्मनिर्भर भारत आणि technology-based growth यावर स्पष्टपणे भर दिला.
(Nitin Gadkari, Tariff Dispute, Export Import, Technology, Economic Power, USA India Trade)